Chief Editor

Dharmendra Singh

Office address -: hanuman colony gole ka mandir gwalior (m.p.) Production office-:D304, 3rd floor sector 10 noida Delhi Mobile number-: 9806239561, 9425909162

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
April 17, 2026

सच दिखाने की हिम्मत

गोंदिया

 

मुंडीपार:-गोरेगांव तालुक्यातील मुंडीपार येथे कोरोना योद्धा सन्मान करण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सात वर्षांचे कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण झाल्यानिमित्त माजी मंत्री राजकुमारजी बडोले यांचे वतीने मुंडीपार येथील फ्रंटलाईन वर्करचे कोरोना योद्धा सन्मान पत्र व सिल्ड देऊन गौरव करण्यात आले.सन्मानपत्राचे वाटप भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणजी भगत, सरपंच सुमेंद्रजी धमगाये , उपसरपंच जावेद (राजाभाई)खान, माजी तं.मु.स. अध्यक्ष नामदेवजी नेवारे , सामाजिक कार्यकर्ते पंढरीभाऊ कटरे, सामाजिक कार्यकर्ते धाडुजी बिसेन व इतर मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच सुमेंद्रजी धमगाये यांनी सांगितले की,सध्या जगावर कोविड-१९ कोरोना महामारीचे संकट असून या महामारीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कुशल नेतृत्त्वात सर्व देश या महामारीचा मुकाबला करण्यास सज्ज आहे.या कार्यात फ्रंटलाईन वर्कर मोठ्याप्रमाणात योगदान देत असून त्यांचे अथक परिश्रमामुळे आपण या त्रासदीचा सामना करू शकतो.त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे वतीने गावातील 16 फ्रंटलाईन वर्करांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

या कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रमाचे संचालन रोहित पांडे व आभार राजेशभाऊ चौधरी यांनी केले.

News24x7india

रिपोर्टर रोहित पटले